विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- जय बजरंग क्लब डुम्मे यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कबड्डी व व्हाॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २५ जानेवारी २०२४ पासून ते अंतिम सामन्यापर्यंत क्रीडा मैदान डुम्मे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रियाज भाई शेख शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा तसेच सहउद्घाटक मनीष दुर्गे शिवसेना ठाकरे तालुकाप्रमुख एटापल्ली या कार्यक्रमास लाभले.
या स्पर्धेचे उद्घाटन रियाज भाई शेख आणि मनीष दुर्गे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुरूष कबड्डी ‘अ’ गट प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये होते. व व्हाॅलीबॉल (पुरूष) प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये पुरुष कबड्डी ‘ब’ गट प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार, महिला कबड्डी सामन्या करिता प्रथम पारितोषिक ७ हजार दुसरा ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये ठेवण्यात आले.
उद्घाटन समारंभ कार्यक्रमात मनीष दुर्गे शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. आजच्या आधुनिक युगात शिक्षणा बरोबरच मैदानी खेळाला सुध्दा विशेष महत्व आहे. खेळामुळे युवकांच्या क्रीडा गुणांना चालणा मिळून शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. ग्रामीण भागातून सुध्दा उत्तम खेळाडू निर्माण झाले पाहीजे. कबड्डी हा सांघीक खेळू असून प्रत्येकांनी संघभावनेने खेळून क्रीडा गुणांचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन अक्षय पुंगाटी यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास उसेंडी सरपंच ग्रामपंचायत गुरुपल्ली, विशेष अतिथी जोगाजी मडावी पोलीस पाटील डुम्मे, पोलाजी दूर्वा, अरुणजी दूर्वा गाव भूमीया, प्रमुख पाहुणे नामदेव हिचामी नगरसेवक न.पं एटापल्ली, सौ. विमल लेकामी शिक्षिका जि.प. शाळा डुम्मे, किसन हिचामी नगरसेवक न.पं. एटापल्ली, किशोर कांदो, लालूजी पुंगाटी , तसेच मंडळाचे अध्यक्ष दुलसा पुंगाटी, उपाध्यक्ष सुधाकर मडावी सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्यगण, शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.

