मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत हद्दीतील मोसम येथे आज दिनांक २८ जानेवारीला मोसम येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटक नामदार धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषाधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्हा पालक मंत्री अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर ) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य गडचिरोली, प्रमुख अतिथी ऋतुराज हलगेकर नियोजन समिती सदस्य गडचिरोली, भुमिअभिलेख अहेरीचे उपाध्यक्ष गुणवंत रणदिवे, देवलमरी ग्रा.पं चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, माजी उपसरपंच सुरेश गुंडावार,ग्रा. पं सदस्य सौ शशिकला मोहंडा ,मोनिका तोकला भुमिलेखा अधिकारी श्री अंभोरे, श्री बोम्मावार, श्री. साखरकर, अरुणभाऊ मुक्कावार, लक्ष्मण येर्रावार प्रमुख्याने उपस्थित होते.
या वेळी धर्मरावबाबांनी नागरिकांशी विविध समस्यांशी चर्चा करून समस्यांचे निवारण करण्यास अधिकारी वर्गांना आदेश दिले व गुड्डीगुडम, मोसम येथील परिसरातील लाभार्थ्यांना धर्मरावबाबा आणि भाग्यश्रीताई यांच्या शुभ हस्ते पट्टे वितरण करण्यांत आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण श्री रणदिवे यांनी केले. तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री सालय्या कंबलवार ग्राम पंचायत सदस्य देवलमरी यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री लालु आलाम, बक्कय्या राऊत, सखाराम पोरतेट, प्रकाश पद्मावार, श्रीहरी सडमेक, राजु कंबलवार, रमेश नैताम, मडावी, राजु सिडाम, हरिश गांडला, रवि सडमेक, श्री. गणपुरवार, भिमराव धंदरे, गणेश तोकला, सौ रामबाई पोरतेट, शशिकला आलाम, पार्वती कन्नाके व इतर नागरिकांनी सहकार्य केले. परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

