अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मोबा. नं. – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २९ जाने:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत ताजुद्दीन बाबा यांचा 163 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने वाकी दरबार येथे साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवा निमित्त 21 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
21 जानेवारीला ताजुद्दिन बाबांच्या पादुकेचा अभिषेक करुन जन्मोत्सवाला सुरुवात झाली. २१ जानेवारी रविवारला निशुल्क वैद्यकीय शिबिराचे आयोजक करण्यात आले होते. यावेळी या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी याचा लाभ घेऊन तपासणी केली. 21 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत रोज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण तसेच श्री. बाबा ताजुद्दीन लीलामृत या पोथीचे सुद्धा येथे पारायण झाले.
22 ते 24 जानेवारीला भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर 25 तारखेला श्री. बाबा ताजुद्दीन स्तोत्राचे सामूहिक पारायण झाले. 26 जानेवारीला भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला.27 तारखेला सकाळी 5.30 वाजता झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदना नंतर बाबांना चादर, अत्तर चढवून केक कापून महाआरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंतर सकाळी 10 वाजता ह.भ.प.श्री.विजय महाराज महाजन यांच्या दही काल्याचे किर्तन होऊन जन्मोत्सवा ची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त तसेच स्वयंसेवक कार्यरत होते. तसेच खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खडसे साहेब व त्यांचे सहकारी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य ट्रस्टला लाभले. बाबांच्या या जन्मोत्सव निमित्त हजारो भाविकांनी बाबांचा आशीर्वाद घेतला. अशी माहिती श्री. बाबा ताजुद्दीन दरबार वाकी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर डहाके पाटील यांनी दिली.