युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपूर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील काटोल जवळील कोंढाळी येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद, शाखा कन्हान तसेच जनहित लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केले गेले भव्य लोक कलावंतांच्या मेळाव्याचे आयोजन दुधाळा ग्रामपंचायत सांस्कृतिक भवन कोंढाळी, तालुका काटोल येथे आयोजित करण्यात आला होता. या मिळाव्याच्या अध्यक्षस्थानी दुधाळा ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर गुजर हे होते. या मेळाव्याचे म्हणून आयोजक बाबाराव दुपारे,(सदस्य व्रुध्द कलाकार मानधन समिती जिल्हा परिषद नागपूर), निशाताई खडसे (सचिव जनहित लोकसेवा संस्था धापेवाडा), राजश्रीताई काळबांडे व ग्रामपंचायत सदस्य गण व समस्त गावकरी मंडळी दुधाळा होते.
या कार्यक्रमात नागपुर जिल्हातील 75 मंडळांनी सहभाग नोंदविला यात गम्मत, भजन, भारूड, तमाशा, नाटक, कव्वाली, दंडार आदी कलावंतांनी आपापली कला सादर केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अलंकार टेंभुर्णे, (कार्याध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद शाखा कन्हान) दयाल कांबळे (अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्हा) नरेंद्र डोंगरे (अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर जिल्हा), मनोहर धनगरे (सदस्य वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हा परिषद नागपूर),अरूण वाहाणे (सरचिटणीस विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्हा), संजय खांडेकर (प्रसिध्दी प्रमुख नागपूर जिल्हा, विदर्भ शाहीर कलाकार परिषद, पत्रकार) युवराज मेश्राम (पत्रकार,वि.शा.क.प), शंकरराव धांडे, मनोज काळबांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमास जिल्हा व तालुका प्रमुख कार्यकर्ते म्हणून सुधाकर मुळेकर (जनहित लोकसेवा सेवा संस्था), ज्ञानेश्वर तायवाडे (विदर्भ शाहीर कलाकार परिषद काटोल), शाहीर यादवराव कान्होलकर (विदर्भ प्रमुख, विदर्भ शाहीर कलाकार परिषद), पुरूषोत्तम निघोट (अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका हिंगणा), रामाजी दुर्वे (अध्यक्ष जनहित लोकसेवा संस्था तालुका नरखेड), केशव शेंडे (अध्यक्ष जनहित लोकसेवा संस्था तालुका सावनेर), मानेराव गुरूजी, अशोक लोणारे, नामदेव ठाकरे, प्रभाकर नागमोते, अंबादास दुपारे, मोरेश्वर मुळेकर, शाहीर ईश्वर खांडेकर, श्रावण क्षिरसागर, विनोद मोटघरे व असंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी सर्व कलाकार मंडळाला आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, ह्यावेळी मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की नागपूर जिल्ह्यात विविध तालुका व ग्रामीण क्षेत्रात अशा मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात येते आम्ही त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नियमित शासनाच्या पायापोटी लागतो आणि दरवेळी कलाकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडली जाते.