उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे महविकास आघाडी ही अनेक पक्षांना एकत्र येऊन मोट बांधून निवडणुक लढणार असे दिसून येत आहे. पण वंचित बहुजन आघाडी यात समाविष्ट बाबत अजून निर्माण झाला नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जाहीररित्या नाराजी व्यक्त करत आहे. त्यात काल महाविकास आघाडीची बैठक मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली.
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपा बाबत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर सहभागी झाले होते. पण त्यांना एक तास बैठकी बाहेर ठेवण्यात आल्याने ते अर्धवट बैठक सोडून बाहेर निघून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आलं होत. मात्र आज अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ओके असल्याचे समजते.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली यात काही मुद्दे आघाडी सोबत मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले. ओबीसी यांची मागणी की आमच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे. दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रहत्यांनी केला. सोबतच आघाडी बरोबर एकत्र यायचंय सत्ता स्थापन करायची आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे 25 मुद्दे वंचित कडून आघाडीला देण्यात आले. या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे व प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडली पाहिजे, स्वीकारणे हा सर्व वेगळा भाग.
ते पुढे म्हणाले, दोन तारखेला ही बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर ही जी तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्मुला 2 तारखे पर्यंत तयार होईल आणि त्याचा मसुदा त्यांनी दिला की मग आम्ही कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का? की प्रत्येक पक्षाशी बोलणी करून तिथे निर्णय होईल. केंद्रा मधलं बीजेपीच्या सरकार पुन्हा येणार नाही, आम्ही कुठलाही पर्सनल इगो व इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही माडली.