मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी येथे “मंडल कार्यशाळा” संपन्न अहेरी मंडलातील भाजपा प्रवासी कार्यकर्ते्यानी गांव संयोजकानी दि.4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत “गांव चलो अभियान” अंतर्गत सर्व गावकरी, दुकानदार, शासकीय कर्मचारी, आशा वर्कर्स, बचत गटांचे पदाधिकारी, सरपंच, भारत सरकार व राज्य सरकारचे लाभार्थी, शेतकरी यांची भेट घेऊन, संवाद करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याण कार्याची माहिती देउन, बुथाची बैठक घेऊन बुथ सक्षम करण्यासाठी कार्य करावे असे आवाहन प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली यानी केले. ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित “गांव चलो अभियान” अंतर्गत अहेरी मंडल कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समारोप भाजपा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे यानी केले.
यावेळी मंचावर आनंद खजानजी सोशल मीडिया प्रमुख, संतोष मद्दिवार, तालुका अध्यक्ष, मुकेश नामेवार शहर अध्यक्ष, मोहन मदने जिल्हा पदाधिकारी, विनोद आकनपल्लीवार जिल्हा पदाधिकारी, अमोल गुडेलीवार, सौ.शालीनी पोहणेकर जिल्हा महामंत्री, भाजपा महिला मोर्चा, गडचिरोली उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या वाँर रुमच्या चमुनी उपस्थित पदाधिकारी, बुथ प्रमुख यांचे नमो अँप, सरल अँप करुन ते कसे चालवायचे याचे प्रोजेक्टर वर प्रेजेंटेशन दिले.
या कार्यशाळेत गांव संयोजक व गांव प्रवासी कार्यकर्ते यांची नावे निश्चित करण्यात आले.नविन मतदार यादी देण्यात आली, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने केलेल्या जनकल्याण कार्याचे पत्रक वितरित करण्यात आले.