मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील सिरोंचा वन विभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्र मध्ये कार्यरत असलेले अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्तींचे चोपिंग वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या 10 दिवसात त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो.
या हत्तींना 40 ते 45 प्रकारच्या जडीबुटीं पासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरड, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रम मध्ये उकडून चोपिंग चा लेप तयार करतात. तो करून महावत ,चाराकटर यांनी सकाळच्या पहाटेला हत्तीचे पाय शेकतात.
महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. पण सध्या ही 12 दिवसासाठी कॅम्प बंद आहे. कारण हत्ती सध्या सुट्टीवर आहेत. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चॉपिंग केलं जातं : नरेश चोके, वन परीक्षेत्र आधिकारी कमलापुर
12 दिवस चालणाऱ्या या चोपिंग मध्ये हत्तींचे विशेष काळजी केले जातो त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते: डॉ. महेश येमचे, पशु वैद्यकीय वन्यजीव अधिकारी कमलापूर