अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने स्थानिक शिवाजी पार्क येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.
शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका सौ.सीमा गलांडे तथा माजी नगरसेविका सौ.नीता धोबे, सौ. कोमल गुळघाणे यांच्या नेतृत्वात या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करण्याचा अनन्य साधारण महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे. जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदीकुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजे आदिशक्तीची पूजा करतो. म्हणून हळदीकुंकू निमित्ताने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सर्व सुवासिनींना एकत्र करून त्यांना वाण वाटण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व स्पर्धा घेऊन त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली. तसेच या ठिकाणी अल्पोहार देण्यात आला.
या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या सारिका अनासाणे, राजश्री देवडे, प्राची पाचखेडे, सिमा खुपसरे, नीलिमा मोहमारे, ज्योती वरघणे, मेघा गूळकरी, रुपाली आवारी, स्वाती पिंपळकर, वर्षा धोबे, नेहा शाहू, प्रियंका धोटे, सारिका सातपुते, सुवर्णा वैदय, स्मिताताई आष्टीकर, सविता धोबे, अर्चना दाणी, रेश्मा बाकरे, मंगला ठवरे, रजनी झाडे, संजीवनी मानकर, मंदाताई धोबे इत्यादीची प्रमुख उपस्थित होती.