मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शिवसेना जिल्हा कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक शिवसेना (शिंदे गट) ने लढवावी अशी मागणी जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकारी बैठकीत करण्यात आली.
राज्यात शिवसेना-भाजपाची युती १९९० पासून कार्यरत असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे २३ खासदार निवडून गेले होते. आगामी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा लोकसभा शिवसेना शिंदे गटाने लढवावी अशी मागणी जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत केली आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचे सरकार मागील दीड वर्षापासून यशस्वीरित्या गतिमान शासन म्हणून कार्यरत आहे. यामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे यांनी महायुती सरकार मध्ये विकासाचा समन्वय साधून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.
शिवसेना पक्ष मागील ४० वर्षापासून जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय असून शिवसेना शाखेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचे काम मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती मध्ये शिवसेनेने प्रतिनिधित्व केलेले आहे.यापूर्वी शिवसेनेने वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा, आर्वी, देवळी-पुलगाव, हिंगणघाट, मोर्शी-वरुड विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवीत आला असून यापूर्वीही आपले वर्चस्व कायम ठेवत शिवसेनेचे उपनेते तसेच जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांनी हिंगणघाट मतदार संघातून तिनदा विजय संपादन करून राज्य सरकार मध्ये मंत्री राहिलेले आहे तसेच वर्धा व हिंगणघाट विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या उमेदवारांनी मागील २५ वर्षापासून लढवीत आला असून मागील दोन टर्म मध्ये भाजपा शिवसेना युतीमध्ये मतदार संघाची अदलाबदल करण्यात आल्याने वर्धा व हिंगणघाट विधानसभा मतदार संघ भाजपच्या वतीने लढण्यात आला होता तसेच २०१९ च्या निवडणुकीत देवळी- पुलगाव विधानसभा मतदार संघात सुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराने चांगली लढत दिली होती.
वर्धा लोकसभा क्षेत्रात शिवसेनेचाही मतदार असल्याने महायुतीच्या वतीने शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव तसेच माजी राज्य मंत्री तथा उपनेते अशोक शिंदे सक्षम उमेदवार म्हणून शिवसेनेने वर्धा लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीला सहसंपर्क प्रमुख निलेश देशमुख, जिल्हाप्रमुख गणेश इखार, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, जिल्हा संघटक महेंद्र महाजन, जिल्हा संघटक संदीप इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, जिल्हा समन्वयक विनोद बाभुळकर, युवासेनेचे वर्धा-हिंगणघाट जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, युवासेनेचे देवळी-आर्वी विधानसभा जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर, वर्धा विधानसभा उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, देवळी विधानसभा उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर, हिंगणघाट विधानसभा उपजिल्हा प्रमुख रवि धोटे, देवळी विधानसभा संघटक शरद जगताप, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.