हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील मागील 3 महिन्यात पासून नदी वरील असलेल्या मोटार मध्ये तांत्रिक खराबी व नदीला पाणी नसल्यामुळे नळ योजना खंडित झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विसापूर गाव मधील प्रत्येक वॉर्ड मध्ये हातपंप बोरिंग अस्तित्वात आहेत परंतु काही कारण मुळे हे हातपंप बोरिंग सुद्धा बंद असल्याने नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याची माहिती गावातील नागरिकांनी बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस सचिव प्रितम पाटणकर यांना गाव मधील नागरिकांनी लक्षात आणून दिले.
या बाबत माहिती मिळताच बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस सचिव प्रितम पाटणकर यांनी तात्काळ या बंद पडलेले हात पंप विषयी माहित विसापूर पाठपुरावा करत ग्रामपंचायतला कळविली आणि तर विसापूर ग्रामपंचायत मार्फत तात्काळ याविषयी निर्णय घेऊन माहिती पंचायत समिती बल्लारपूर येथे देण्यात आली. बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस सचिव प्रितम पाटणकर यांच्या प्रयत्नाने गावामधील बंद पडलेले 13 हातपंप बोरिंग दुरुस्ती करण्यात आले