विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- शालेय पोषण आहार सभागृह, अहेरी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन अहेरी तालुका मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आयटक जिल्हा संघटक कॉ. सचिन मोतकुरवार यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. सचिन मोतकुरवार, आयटक जिल्हा संघटक, कॉ. विनोद जोडगे, राज्य सचिव तसेच अनेक पदाधिकारी आणि शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.
या तालुका मेळाव्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा. वेतनवाढ, कायमस्वरूपी नोकरी, सामाजिक सुरक्षा यांसारख्या मागण्यांसाठी आवाज उठवणे. शासनाकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी या मेळाव्यातील काही ठराव पण घेण्यात आले. त्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन ₹26,000/- द्यावे. कायमस्वरूपी नोकरीची मागणी. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा. पोषण आहार योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. असे ठराव यावेळी पास करण्यात आले. शासनाकडे निवेदन सादर करणे. आंदोलन करण्याचा निर्णय पण यावेळी ठरले.
या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे युनियनचे आभार मानले.