मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रं.1 व 2 मध्ये जाऊन त्या जनतेचा समस्या बद्दल विचारपूस करत त्या जाणून घेतल्या.
राजाराम ग्रामपंचायतचे नवंनिर्वाण क्षेत्रातुन निवडून आलेले उपसरपंच रोशन कंबगौनीवार आणि सदस्यगण यशोदा आत्राम, सदस्य पूजा सोयाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी आस्थेने विचारपूस करून प्रभागातील समस्या वर चर्चा करून सदर समस्याचे निराकरण करण्याचे ग्राम पंचायतच्या वतीने दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थित वार्डातील महिला-पुरुष यांनी आनंद व्यक्त केले आहे आणि गावातील नागरिक संतोष मोहुर्ले, रझु मोहुर्ले, बापू अलम्मवार, लक्ष्मीनारायण नामनवार, संपत चिटकला, राजेश मारणोल, अईदूलवार परिवार उपस्थित होते.

