उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली : वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शास्त्रीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करुन पक्षाची भूमिका तळागाळात पोहोचवावी, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा सरचिटणीस किरणराज कांबळे म्हणाले, वंचित आघाडीने गत लोकसभा निवडणुकीत विक्रमी मते खेचून आणली होती. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर जो आदेश देतील तो प्रमाण मानून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी किशोर आढाव, उदय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस प्रा. बापूसाहेब पुजारी, रमा साबळे, आनंद कांबळे, आनंदसागर पुजारी, एल. डी. कांबळे, चंद्रकांत कांबळे, ऋषिकेश माने, अपर्णा वाघमारे, अभिजित कांबळे, आदर्श कांबळे, प्रशिक कांबळे, अमोल हर्ष यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.