मेहकर ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत भव्य बाईक रँली व मशाल जोडो यात्रेच आयोजन.
उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 11 फेब्रुवारीला पदाधिकारी मेळावा तथा आढावा बैठक, तसेच मेहकर ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत मेहकर तालुका अध्यक्ष दुर्गादास अंभोरे, मेहकर शहर अध्यक्ष महादेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रँली व मशाल जोडो यात्रेच आयोजन केले आहे.
या भव्य बाईक रँली व मशाल जोडो यात्रेला मेहकर येथून सुरुवात होईल त्यानंतर सुल्तानपुर, दुसरबीड, किन्हगावराजा, सिंदखेडराजा, नाव्हा, जालना, छत्रपती संभाजीनगर पर्यंत होणार आहे तरी जिल्हा तालुका, शहरातील पदाधिकारी, सदस्य यांनी आपल्या गावपातळीवर थांबावे, तसेच आढावा बैठकीत संघटनेच्या कार्याविषयी प्रशिक्षण व प्रमुख मार्गदर्शन करण्याकरीत ॲड.देवकांत मेश्राम, अविनाश कांबळे, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ. निशा सोनावणे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव सौ. ललिताताई मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे तरी महाराष्ट्र राज्यातील, जिल्ह्यातील व तालुक्यातील, शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महीला आघाडी, व आजी, माजी कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित रहावे. असे आव्हान तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळावा तथा आढावा बैठक 11 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 11:00 वाजता सुभेदारी विश्रामगृह छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संतोष खरात, अंकुश हिवाळे, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच सर्व आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.