मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील व्यंकटापूर आवलमरी येथे व्हॅलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. व्हॅलीबाल या स्पर्धेचे उद्घाटन नामदेव मडावी हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुलू पाणेम हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्येकटापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजिक्य जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
या व्हॅलीबाल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांचे कडून 25 हजार रुपये तर दृत्तीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवक रामेश्वर बाबा आत्राम यांचे कडून 20 हजार रुपये तसेच तृत्तीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते मुसली तलांडी आणि व्यंकटी पानेम यांचे कडून देण्यात आले आहे.
या व्हॅलीबाल सामन्यात जास्तीत जास्त संघ सहभाग नोंदविला आहे. यावेळी गावातील नागरिकाना व्हॅलीबाल सामन्यात थरार बघायला मिळाला. यावेळी हे व्हॅलीबाल सामने बघण्यासाठी गावातील नागरिकानी मोठया संख्येने उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्हॅलीबाल स्पर्धा कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. यावेळी नागेश पेदांम, देवलमरी चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, टाटाजी गेडाम, कीशोर करमे ताजु कुळमेथे, राकेश दोंतुलवार, नागेश कुमराम, शैलेश गेडाम, श्रीकांत तलाडीं, मखमूर शेख, शंकर आत्राम, खुशाल तलांडी, चींना मडावी, वेंकटस्वामी श्रीनिवास आत्राम, प्रवीण मुसली, मारोती तलांडी, बाबुराव झाडे, बापू ठाकरे, मल्लय्या अतुल आत्राम आदी गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

