आमचा पक्ष, आमचे चिन्ह शरद पवार साहेब घोषणा देत केला निषेध. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकत्यांनी केले निषेध आंदोलन.
अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष याबद्दल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हिंगणघाट शहरातील शरद पवार गटा कडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध करण्यात आला.
केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. या निवडणूक आयोगाने दिलेला निर्णयाचा शरद पवार गट तीव्र करीत आहे. परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, महाराष्ट्राचा महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्या पक्षाची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप शरद पवार अजून सोबत आहे असे मनोगत संतोष तिमांडे यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, अमोल बोरकर, सुनील भुते, महिला शहराध्यक्ष मृणाक रिठे, कार्याध्यक्ष सिमा तिवारी, सुजाता जांभुलकर, मिनाक्षी मेश्राम, दिपाली रंगारी,प्रचार प्रमुख राजू मेसेकर, गोमाजी मोरे, अजय पर्बत, अनिल लांबट, नितीन भुते, बच्चू कलोडे, गजानन महाकाळकर, सुधाकर वाढई, प्रशात एकोणकर, उमेश नेवारे, सुभाष सोयाम, परम बावणे, संजय गाभुले, सचिन भजभूजे, कुणाल येसम्बरे, श्रुषीकेश मेश्राम, रोहित बक्षी, हर्षल सॅम्युअल, राहुल जाधव, राजू मुडे, अमित रंगारी, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, वैभव साठोने, आशिष शेंडे, नदीम अली, रवी कुटे, आदित्य बूटे, विशाल मुंजेवर, रवी मेसेकर, वैभव भुते, निखिल ठाकरे, शाहरुख बक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.