✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
हिंगणघाट:- तालुक्यातील काजळसरा येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी यापुढे गावातच आरोग्य सेवा उपलब्ध होणार नवीन इमारतीचे लोकार्पण मला आनंद होत असल्याचे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुर्ण सेवाभावनेने रूग्णांची सेवा करण्याचें आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी पंचायत समिती सभापती गंगाधर कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पराडकर, जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ नाईक, अंकुश ठाकुर, आकाश पोहाणे विनोद विटाळे, आदी अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.