निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
कोरपना:- तालुक्यातील आसन खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या गावात १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत,परंतु मागील गेल्या २ वर्षांपासून फक्त दोनच शिक्षकांवर ७ ही वर्गाचा भार आहे,त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवीत असताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा फरक पडत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे येथील आसन खुर्द येथील विषय शिक्षकांचे पदे तात्काळ भरण्यात यावी याकरीता शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले,तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आसन खुर्द येथील शिक्षकांची पदे भरण्यात यावी याकरिता भ्रमणध्वनीद्वारे सूचना दिल्या,यावेळी आसन खुर्द येथील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, आसन खुर्द येथील भाजपा अध्यक्ष प्रमोद पायघन, ग्रामपंचायत सदस्य भास्कर मत्ते, सुरेश पेंदोर, गणेश मुरकुटे, श्रीराम नांदेकर,अविनाश पेटकर,अशोक धाबेकर,सुरेश किन्नाके,सोनू कुमरे, सुनीता आके, वनिता पायघन उपस्थित होते.