गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मिरवणुक निघणारच : पंकज साबळे याचा इशारा.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बार्शीटाकळी:- तालुक्यामधिल राजंदा येथे शिवजयंतीच्या परवानगीसाठी गेलेल्या युवकांना परवानगी नाकारण्यात आल्याने माहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी चांगलेच भडकले आहेत. याप्रकरणी त्यांनी अकोला निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तरीही आम्ही शिवजयंती साजरी करू. पोलिसांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आव्हानही मनसेचे जिल्हध्यक्ष पंकज साबळे यांनी दिले आहेत.
शंभूराजे मित्र परिवार व समस्त गावकरी यांचे वतीने दरवर्षी राजंदा ता. बाशीटाकळी, जि. अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) निमीत्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक काढत असतात. या वर्षी देखील ते मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगीसाठी गेले असता त्यांना परवानगी नाकारल्या गेली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
शंभूराजे मित्र परिवार व समस्त गावकरी गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. शिवजयंती सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, सांस्कृतीक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा, तसेच शिवचरित्रावर व्याख्यान, प्रवचन व किर्तन यासारख्या उपक्रम राबवितात. परंतु पोलिस प्रशासनाकडून यंदा परवानगी देण्यास टाळाटाळ करत परवानगी नाकारत आहेत. यावर्षी सुध्दा भरघोस कार्यक्रमांच आयोजन गावात करण्यात येत असून या कार्यक्रमांसह गावामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक पारंपारीक वाद्य व बँडपथकासह दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढावयाची आहे. पोलिसांनी परवानगी द्याची अन्यथा आमच्या विरुध्द गुन्हे नोंदवावेत असे थेट आव्हान मनसेतर्फे दिले गेले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचेसह परशुराम गोपाल चव्हाण, तेजस मंगेश चव्हाण, विठ्ठल गजानन महल्ले, मनोज प्रभाकर पवार, अनुराम गजानन सुरोशे, ऋषिकेश रामदास जिते, अभिषेक यांच्या स्वाक्षरी आहेत. आता जिल्हा व पोलिस प्रशासन याप्रकरणी काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.