Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा: भास्कर फरकडे यांची मागणी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा: भास्कर फरकडे यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी: माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विविध भागात अपुरी बससेवा, प्रवासी निवाऱ्याचा अभाव, बससेवे अभावी दररोजची पायपीट यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींची गैरसोय सुरूच आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यावर उन्हाचे चटके, पाउस, वारा झेलत कितीतरी तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने आता लालपरीवर शालेय विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील फाट्यावर बसच्या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थिनींना कितीतरी तास थांबावे लागत आहे. त्यात निवारा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो आहे तर मार्कंडा कंन्सोबा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टी येथे बसच्या प्रतीक्षेत कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागत आहे.

तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद शाळा खाजगी संस्थेचे विद्यालये व महाविद्यालय डी .एड, बी एड कॉलेज असल्याने परिसरातील १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील जवळपास २० गावातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे विद्यार्जन करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, चंदनखेडी, मार्कंडा कंन्सोबा, लगाम सिंगनपल्ली या गावातील विद्यार्थ्यांना आष्टी येथे जावे लागते.

आष्टी मधून परत स्वगृही परत जाण्यासाठी बाजूला निवारा आहे, तोही मोडकळीस आलेला आहे व अखेरची घटका मोजत आहे परंतु आष्टी येथून परत जात असताना आष्टी या शहरात विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेमध्ये तासभराहून अधिक काळ थांबावे लागत आहे, त्या बाजूला विद्यार्थिनींना बसण्याच्या निवारा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी बसण्यासाठी निवारा व्हावा,अशी शालेय विद्यार्थिनींच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांच्याकडून मागणी केली जात आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मागील काही काळात प्रवासी निवारा मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बांधण्यात आला आहे परंतु त्या प्रवासी निवाऱ्याची संपूर्ण दुर्दशा झाली असून बसण्यायोग्यही नाही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या झाडांचा प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा चातक पक्षा प्रमाणे वाट बघावी लागत असते एसटी आली की प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना व विध्यार्थांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर तीनही बाजूंनी वाहने आली की मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतअसतो त्या नंतर नाका-तोंडात धुळीकण जात असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी शेड उभारण्यात यावा अशीही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव भास्कर फरकडे यांनी केली आहे.

Previous Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे फळ वाटप.

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा आदेश दिला होता: आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा आदेश दिला होता: आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप.

देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा आदेश दिला होता: आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In