संतोष मेश्राम राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तालुका ग्रामीण यांच्याकडून मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रशांत झांबरे, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुमित डहाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तालुका कार्याध्यक्ष तनवीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बल्लारपूर तालुका अध्यक्ष ग्रामीण योगेश निपुंगे, विसापूर शहर अध्यक्ष प्रदीप लांडगे, माजी नगरसेवक सरफराज आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

