अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतूषार वारे यांच्याकडे जिल्हा शल्य चिकीत्सकचा पूर्ण पदभार असून त्यांना उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळचा जास्तीचा पदभार देऊन अकोला जिल्हाच्या रुग्णांवर व तसेच लोकानवर अन्याय होत आहे.
त्याचे कारण की अमरावती विभातिल 4 जिल्हातील रुग्ण सर्वोपचार रुग्णालय अकोला उपचार करीता येतात, रुग्ण जास्त गंभीर असल्याने काही कारणास्तव डॉक्टर त्यांना रेफर अमरावती, नागपूरला करतात, पण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वर उपसंचालकाचा पदभार असल्याने त्यांना मीटिंग आणि ग्रामीण रुग्णालय ला भेट देणे व जिल्हा बाहेर ही जाणे त्यामुळे, बरेच लोक मेडिकल सर्टिफकेट साठी येतात, मेडिकल बिलसाठी लोक येतात, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र असो की, नागपूरला रेफर केलेल्या रुग्णांसाठी, रुग्णवाहिकेसाठी (जिल्हा शल्यचिकित्सक) यांची सही घ्यावी लागते. पण जिल्हा शल्य चिकित्सक वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांचा अतिरिक्त असलेला उपसंचालक चा पदभार काढून त्यांना पूर्ण वेळ रुग्ण सेवा करता येईल. म्हणून सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी तत्कालीन आयुक्त तुकारामजी मुंडे आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक यांच्या कडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती. परंतु एक दोन वर्षे उलटुन ही त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास करावा लागत होता. म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंगतुषार वारे यांच्या कडे असलेला उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ अकोला चा पदभार काढुन घ्यावा व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली होती.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत अकोला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडे असलेला अधिकचा आरोग्य उपसंचालक चा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्या जागी डॉ कमलेश भंडारी यांची आरोग्य उपसंचालक सेवा मंडळपदी नियुक्ती करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ता यांच्या मुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका झाली आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात दुर्धर आजाराच्या प्रमाणपत्रासाठी, मेडिकल बिल, फिटनेस सर्टिफिकेट साठी चकरा मारणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले असुन सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या आणखी एका रुग्णांसाठीच्या मागणीला यश आले आहे.