राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
मोबा. 8767747671
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- जिवती तालुक्यात उमेद अभियान राबविण्यात आले, तेव्हा पासुन गाव खेड्यातील महीला मध्ये खुप मोठ्या प्रमानात आर्थिक व मानसिक प्रगती झालेली दिसुन येते. या पुर्वी तालुक्यात महिला ना आपले कुटुंब चालविण्यासाठी काबाड कष्ट करुन पैसे गोळा करावे लागत असत परंतु आता हे चित्र बदलले दिसुन येत आहे.
उमेद अभियाना मार्फत महिला बचत गट बनवुन दर महिन्याला पैशाची बचत केल्या जाते आणि महिला बचत गटांना बॅंके कडुन कर्ज मिळवुन दिल्या जाते यामुळे महिला ना आपला घर परपंच चालवण्यासाठी खुप मोठी मदत होत असते. तसेच उमेद अभियानाने सुशिक्षित बेरोजगार महिलांना अभियानात नोकरी देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला दर वर्षी प्रमाने ह्याही वर्षी 10 फेब्रुवारी रोज शनिवारला पुनागुडा येथे प्रेरणा ग्राम संघ पुनागुडा ह्या बचत गटाकडून मौजा पुनागुडा येथे वार्षिक सभा आयोजित करण्यात आली. या सभेला सर्व ग्राम संघातील पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
या सभेचे संचालन आयसीआरपी योगिता लष्करे यांनी केले असुन सीएलएफ मॅनेजर वैशाली ब्राह्मणे व मास्टर पशु सखी गीतांजली यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सीएलएफ मॅनेजर वैशाली ब्राह्मणे यांनी सर्व महिलांना अभियानाच्या नियमावलीची माहिती दिली व विविध योजना कशा मिळवायच्या व योजनांचा वापर कसा करावा या बद्दल माहिती दिली व मिनी बॅंक अवजारांचा वापर कसा करावे या बद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मास्टर पशु सखी गीतांजली मॅडम यांनी सुद्धा महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रेरणा ग्राम संघाच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड तसेच सचिव सुरेखा जोंधळे व कोषाध्यक्ष चंद्रकला ढवळे व प्रेरणा ग्राम संघातील सर्व सदस्य महिला उपस्थित होत्या.