आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी गरपीट पावसामुळे जिल्हातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे कंबरड मोडलय आहे. त्यामुळे परत एकदा शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे.
१० फेब्रुवारीला संध्याकाळी झालेल्या गरपीटीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलय. बोराच्या आकाराची पडलेल्या गारपीटने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिंगणघाट, देवळी, पुलगाव, वर्धा तालुक्यातील अनेक गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, तूर, कापूस, गहू, टरबूज पिकांसह भाजीपाला पिकांच नुकसान या भागात झाले असून शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडा जवळ आलेला घास हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
देवळी तालुक्यातील विजयगोपाल मंडळातील इंझाला, विजयगोपाल, तांबा, नांदगाव, शेंद्री या गावातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठे जमीनदोस्त झालेली गहुची पिके तर कुठे चण्याच्या पिकांचे नुकसान. भाजीपाला पिके तर पूर्ण उध्वस्त झाली. या परिसरातील शेती पिकांचे ९० टक्के नुकसान झाल्याच शेतकरी सांगतात. निंबाच्या आकाराची झालेली गरपीट ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढला. नुकसानीचा मोबदला मिळणार असं सांगण्यात आलं. पण अनेक शेतकरी खरीपमध्ये झालेल्या नुकसानीच्या मोबदल्या पासून वंचित आहे. गारपीटीने झालेल्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन तक्रार नोंदणी पोर्टलवर तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण संकेतस्थळावरून प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळत नसून तक्रारीचा ओटीपी सुद्धा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने याकडे लक्ष देत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांचे तक्रार नोंदवावी व ज्या पीक विमा काढला नाहीय त्यांनाही तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जातं आहे.

