उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ काही नवजात अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
अकोला जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत एकाच वेळी चार नवजात अर्भकांचे मृतदेह आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
अकोला जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी मिळताच ताबडतोब पोलीस अधिकारी आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल होत या घटनेचा तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हे मृतदेह कुठून आले? आणि कुणी ते असे बेवारस फेकून दिले याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवालानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. तसेच, सापडलेलं अर्भक स्त्री अर्भक आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
काय आहे हे प्रकरण? जिल्हा परिषद उर्दू शाळा अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात आहे. हे ठिकाण गजबजलेलं आणि वर्दळीचं आहे. या शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलं पुरती घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या काही लोकांशी संपर्क साधला. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल.” दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात चार अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकच मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.