आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- काल रविवारी सायंकाळी समुद्रपूर हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या गारांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली. यामुळे शेतकरी हवालदिल आला आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील व हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस गारांसह धोधो बरसला. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कोसळलेल्या पावसाने व गारपिटीने चांगलाच कहर केला. यासोबत जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या वादळी पाऊसमुळे शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले आहे. या पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.