डॉ.आशिष देशमुख सपत्नीक जनसंपर्क साधणार.
अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं. – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागपूर जिल्ह्यात ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी व सह-मुख्य प्रवक्ते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख हे सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ ला पाटणसावंगी, ता. सावनेर येथे प्रचंड जनसंपर्क साधतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ. आयुश्रीताई देशमुख यासुध्दा या गाव चलो अभियानात सहभागी होत आहेत.पाटणसावंगी येथे त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांसोबत दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत.
बूथ कमिटी मीटिंग (बूथ कमिटी/बूथ लेव्हल वर्क डिव्हिजन कमिटी/पन्ना प्रमुख), जनसंघाचे जेष्ठ कार्यकर्ते यांची भेट, विचार परिवारातील कार्यकर्ता भेट, युवा कार्यकर्ता बैठक, प्रगतशील शेतकरी व व्यावसायिकांची भेट, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट, शालेय विद्यार्थ्यांची भेट, प्रभावी व्यक्तींची भेट, बचत गट कार्यकर्ता भेट, धार्मिक स्थळांना भेट, अनुसूचित जाति- जमाती वस्तींना भेट, जि.प.सदस्य भेट, पं.स.सदस्य सभा, ग्राम पंचायत सदस्य भेट तसेच सेवा सहकारी संस्थेचे अधिकारी, शहीद कुटुंबे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोस्टमन, तलाठी, पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते आणि अन्य नेत्यांच्या भेटी ते या अभियानांतर्गत घेणार आहेत.
डॉ. देशमुख यांचे ग्रामविकासाचे ध्येय असून ग्रामीण जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत. महिला सशक्तीकरणावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाचे विकासकार्य ते जनतेपर्यंत पोहोचवतील.