उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्थानिक विश्रामगृह येथे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शंकर कंकाळ जिल्हा संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी भेट घेऊन अकोला जिल्हातील व शहरातील विविध प्रश्नासाठी निवेदन दिले.
अकोला शहरातील घरकुल योजना ही स्लम एरियामध्ये मोठ्या प्रमाणात बंद आहेत सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील सर्व झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुद्धा सुरू झाली पाहिजे याचे सुद्धा निवेदन दिले. त्याच बरोबर डॉ. आंबेडकर नगर या ठिकाणी भेट देणे बाबत सुद्धा निवेदन दिले.
त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक सांगितले की लवकरच घरकुल या विषयावर बैठक घेऊन आणि परिसरातील नागरिकांचे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यात येणार असे सांगितले.
यावेळी शंकर कंकाळ यांनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शाल घालून स्वागत केले जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे की शासकीय घरकुलांना पाच ब्रास वाळूही मोफत मिळणार या निर्णयाचे शंकर कंकाळ यांनी स्वागत केले. यावेळी पवन कनोजिया, अमन घरडे, हरिनाम सिंग रोहल, आनंद मानकर, श्रावण भटकर सह अनेक सहकारी उपस्थित होते.