उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- 2 मार्चला शेगाव येथे होणाऱ्या संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेत हजारों लोक सहभागी होणार. काल 11 फेब्रुवारी रोजी समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्थानिक कॉग्रेस भवन शाम नगर येथे मुख्य पदाधिकारी/कार्यकर्ता बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने आगामी 2 मार्च रोजी शेगाव येथे होऊ घातलेल्या संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेच्या तयारी निमित्त समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या मुख्य पदाधिकारी यांची बैठक हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शेगाव येथे होऊ घातलेल्या भव्य परिषदेच्या तयारी निमित्त आढावा घेण्यात आला. या परिषदेत नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून कॉग्रेसचे मान्यवर तसेच समाज क्रांती आघाडीचे पदाधिकारी संबोधित करनार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता संविधान संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे याकरिता समाजात हा संदेश पोहचवण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आस्था असणारे हजारो लोक सहभागी होणार आहेत. सदर परिषदेत नियोजन बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्वपूर्ण बैठकीत संस्थापक सदस्य सुभाष मेश्राम, डॉ.गोपाल उपाध्ये, डॉ.प्रभाकर नगराळे, प्रा.अशोक वानखडे (विदर्भ अध्यक्ष), बंडुदादा वानखडे (उपाध्यक्ष), माधवीताई फुलझेले नागपूर, भगवान गायकवाड, दिगांबर पिंप्राळे अकोट, विष्णु वाडेकर (वाशिम), रविंद्र फुले, अशोक इंगोले, पुण्यवर्धन राउत, अमर वासनिक, ज्ञानेश्वर मोहोड, डॉ.अमित सुर्यवंशी, प्रशांत तेलमोरे, सुखनंदन दाभाडे, देवानंद तिडके, सुदर्शन थोरात, अण्णा सुरजुशे, बबलु किरदक, अनिल वानखडे, सुदाम शेंडे, ओमप्रकाश झोड, कुमार संजय यांचेसह जवळपास 70 लोक बैठकीत उपस्थित होते. या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन प्रा. प्रमोद मेश्राम (संयोजक समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले होते.

