संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 12 फेब्रुवारी:- ३४ महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉक्सिंग पोलिस गेम नाशिक येथे दिनांक ७ फेब्रुवरी ते ९ फेब्रुवरी २०२४ आयोजित करण्यात आले. या स्पर्धात चंद्रपुर जिल्याची स्टार ३ रेफरी वर्षा कोयचाळे या चंद्रपुर जिल्हाच्या पहिला महिला बॉक्सिंग रेफरी आहे. त्यांना दुसऱ्यांदा बेस्ट जज् नी सन्मानित करण्यात् आले आहे.
या अगोदर जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरित जूनियर बॉक्सिंग स्पर्धेमधे पण त्यांना बेस्ट जज् नी सन्मानित करण्यात आले होते. चंद्रपुर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ .प्रेमचंद, डॉ .राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन चे सचिव, राज्यस्तरीय प्रशिक्षक विजय डोबाळे, अमर भांडरवार, आलोका बिस्वास, प्रा.सांगिता बाबोड़े, प्रा.पूर्वा खेरकर, डॉ .दिलीप बगड़े, दिलीप मोडक, ऍड.मिलिंद रायपूर, हरिश्चन्द्र विरुटकर, भास्कर फरकाडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष प्रा. दीपक भवर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, नागपूर विभागीय अध्यक्ष विजय जांभुळकर, संतोष देरकर, बबलू चव्हाण, आशिष करमणकर, यांनी पुढचा भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.