राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती दि.13:- जिवती तालुक्यातील पुनागुडा गावात नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेत 100 च्या वर कबड्डी संघानी सहभाग घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना कबड्डी सामन्याचा थरार बघायला मिळाला.
नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेत विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15 हजार रुपये इतके कृषी बाजार समिती गोंडपिपरीचे संचालक महेंद्रसिगं चंदेल यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर दुसरे व तिसरे पारितोषिक शरद जोगी नगरपरिषद गडचांदूरचे उपाध्यक्ष यांनी व भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते भुषण फुसे यांच्या कडून तिसरे पारितोषिक देण्याचे येणार आहे.
या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धेत पारितोषिक देते हे प्रामुख्याने पुनागुडा येथे उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी भाषणाच्या माध्यमातुन सर्व खेळाडुला शुभेच्छा दिल्या. यावेळी भुषण फुसे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून बहुजनांना आपले संविधानातील हक्क व अधिकार कोणते आहेत या बद्दल माहिती दिली व ॲक्ट्रोसिटी कायद्याचे फार मोलाचे ज्ञान दिले. असुन कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी खेळाडु आणि गावकरी मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.