अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगरी मध्ये 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत श्री.प्रभु विश्वकर्मा मंदिर, साई मंदिर जवळ श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ तसेच विश्र्वशांती व विश्वातील वैकुंठवासी झालेले मनुष्य प्राणी यांच्या आत्म्याला शांती मिळावी व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
15 फेब्रुवारीला सकाळी 7 वा. गुरुवर्य ह.भ. प.भास्कर सेनाड महाराज सावनेर यांच्या हस्ते कलश पूजनाचा कर्यक्रम संपन्न होईल. कथेची वेळ दररोज सकाळी 9.30 ते 12 पर्यंत.दुपारी 3 ते 6 पर्यंत राहील. ह.भ.प.कुमारी संगीता गायधने यांच्या मुखाग्र वाणीतून दररोज ज्ञानेश्वरी पारायण होईल नंतर लगेच हरिपाठ होईल.
20 फेब्रुवारी मंगळवार ला रात्री 8.30 ते 10.30 पर्यंत किर्तनकार प.पु.गुरुवर्य ह.भ.प.अनिल महाराज अहेर नागपूर यांचे किर्तन होईल.
22 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 पर्यंत किर्तनकार प.पु.गुरुवर्य ह.भ.प.अनिल महाराज अहेर नागपूर यांचे काल्याचे किर्तन आटोपल्यानंतर लगेच
महाप्रसाद दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत राहिल व कार्यक्रमाची सांगता होईल.
ज्या भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करायचे असेल त्यांनी स्वतः जवळील ग्रंथ आणावा पारायणाची व्यवस्था ठरलेल्या वेळेत केलेली आहे.
जास्तीत जास्त भाविक मंडळींनी किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री.प्रभू विश्वकर्मा विकास मंडळ सावनेर यांनी केले आहे.