अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा येथे 18 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाएल्गार सभा होणार आहे. या महाएल्गार सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेच्या हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने प्रत्येक गावात याबाबद बैठका घेतल्या जात आहे.
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली सर्कलच्या कार्यकर्त्यांची बैठक दि.12 फेब्रुवारी सोमवारला नवनीत भगत यांचे निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते काशिनाथजी चारभे गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत वर्धा येथे होणार्या 18 फेब्रुवारीच्या महाएल्गार सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. तेव्हा वाघोली सर्कलच्या 17 गावातून 500 स्त्री, पुरूष नेण्याचा निर्धार करण्यात आला.
या वेळी नवनीत भगत, अतुल मेंढे, नागेश वासेकर, गणेश भांदककर, सत्यवान वासेकर, शैलेश मेंढे, राजकुमार वासेकर, नीलेश नील, प्रविण गोटे, प्रकाश थुल, प्रणय वासेकर, साहील गोटे, बंटी मेंढे, हनुमान जीवतोडे, विशाल थुल, प्रगती भगत, सिद्धार्थ भगत, दशरथ जिवतोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला वाघोली सर्कलचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते

