प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सिंदी (रेल्वे) पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. यावी पोलिसांनी घराच्या छतावर मडक्यात लपवून ठेवलेल्या गांजा जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
सिंदी (रेल्वे) पोलिसांनी मिळालेल्या सूचनेवरून रविवारी सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आशीष रामटेके याच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यावेळी घराच्या छतावरील एका मडक्यात लपवून ठेवलेला १२८-५ ग्राम गांजा मिळाला.
रेल्वे गेट परिसरात मादक पदार्थांची विक्री सुरु असल्याच्या माहिती वरून रविवारी सायंकाळी आशीष जागेश्वर रामटेके याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घराच्या छतावर जाऊन पाहणी केली असता एका माठात मध्ये प्लॉस्टिकच्या २८ पुड्यात गांजा मिळाला. या गांजाचे वजन १२८.५ ग्रॅम अंदाजे किंमत 2500 रुपये असून पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी आशीष विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्यामसुंदर सूर्यवंशी आणि सहकारी करीत आहेत.