आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज वर्धेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. शिवाय बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध सतरा मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बेसिक मानधनात ३० टक्के पगारवाढ, वयाच्या ५८ वर्षापर्यंत शास्वत रोजगाराची हमी. याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास २१ फेब्रुवारीला एक दिवसीय धरणे आंदोलन, दोन दिवसीय काम बंद आंदोलन केले जाईल. तरी देखील मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासुन बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

