मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हिंगणघाट मंडळच्या वतीने बस स्थानक परिसरात बस मधिल महिला प्रवाशांना तिळसंक्रतीच्या निमित्याने व वंसत पंचमी चे औचित्य साधून हळदीकुंकू लावून तीळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.
महिला वार्गाकरिता केंद्र शासनाचे वतीने विविध योजना राबविल्या जात आहे तसेच राज्यसरकार ने महिलांनासाठी बस मध्ये अर्ध्या तिकीटची सवलत दिल्यामुळे महिला प्रवाश्यानी शासनाचे मनापासून आभार मानले.
या उपक्रमात अनिता मावळे, रविला आखाडे, किर्ती सांयकार ,संगिता मेंढे अर्चना एटीवार, रसिका रोहणकर, रजनी सावळे, मंगला घोडमारे आदी महिला पदाधिकारी सहभागी होते.