अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात आपल्या हक्कासाठी ओबीसी बांधव एकत्र आले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये, ओबीसींची जनगणना व्हावी, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशा विविध मागण्यासाठी हिंगणघाट शहरात आज ओबीसी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढलाय. या मोर्चात माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेसचे पंढरी कापसे, अनिल जवादे, सतिश धोबे याच्यासह विविध पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते.
हरीओम सभागृहातून या मोर्चाला सुरवात करण्यात आली होती. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचला व विविध ओबीसी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह महिला व युवकांचा विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग नोंदविला होता.
यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, पुरुष आणि तरुणांनी डोक्यावर टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालत ओबीसींच्या मुद्द्याकडे या मोर्चातून लक्ष वेधण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या रेटून धरण्यात आल्या आहे.