उषाताई कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर येथे दि.19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तथागत ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी आपल्या छोट्याखानी अध्यक्षस्थानाच्या भाषणातून सांगितले शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. गनिमीकावा तंत्राचा वापर करून अनेक गडकिल्ले सर केले. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र कार्य केले. रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिल्यामुळे शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे तथागत ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून उपस्थितीना मार्गदर्शन करताना विचार व्यक्त केले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, ॲड. देवकांत मेश्राम, संतोष खरात, गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, सुनिल वनारे, राधेश्याम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, संदिप राऊत, गौतम नरवाडे, रूपेश गवई, गणेश वानखेडे, राम डोंगरदिवे, श्रीकृष्ण शेटाणे, नितीन बोरकर आदी समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.