प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड दि. 18:- रोजी विदर्भ पटवारी संघटना उपविभाग शाखा ब्रम्हपुरी यांची वार्षिक आमसभा पार पडली असून सभेअंती सन 2023-24 या वर्षा करिता नवीन कार्यकारणी ची निवडणूक पार पडली.
या निवडणुकी अंती निवळून आलेले नवीन कार्यकारणी म्हणून अध्यक्षपदी चेतन चेंनुरवार तलाठी नागभीड उपाध्यक्ष म्हणून मनोज भोयर तलाठी एकारा सचिव पदावर मुकेश बोधनवार मंडळ अधिकारी, ब्रम्हपुरी सहसचिव पदावर ज्ञानेश्वर मगर तलाठी नवेगाव पांडव कोषाध्यक्ष पदावर अमित मुन तलाठी चिखल गाव अशी नवीन कार्यकारणी ची निवळ करण्यात आलेली आहे.
सदर आमसभेत प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हा सचिव श्री. संपतजी कन्नाके व समस्त तलाठी यांचे समवेत सभा पार पडली. यावेळी सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

