अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लवकरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रशासनिक स्थरावर निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत आहे.
लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागले असून याच अनुषंगाने बुधवारी 21 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयासह विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक संबंधी पुर्व तयारीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्टॉग रुमची पाहणी सुध्दा केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार सतिश मासाळ ठाणेदार मनोज गबने आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.