प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा दहा हजार प्रेक्षकांना बसण्याची आसन व्यवस्था शहरातील दोन मैदानावर पार्किंगची व्यवस्था व रसिकांना सलग दोन दिवस मिळणार नामवंत गायकांच्या गीतांची मेजवानी
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट शहरात मध्ये महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचनालय व जिल्हा प्रशासन यांचे समन्वयातून हिंगणघाट येथे टाका ग्राउंड वर दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार सतीश मसाळ, नगर पालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पोलीस निरीक्षक मनोज गभने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धमाने यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक चंद्रकांत माळवे, अंकुश ठाकूर, राजू गंधारे आदी उपस्थित होते.
दिनांक 23 व 24 फेब्रुवारी या दोन दिवसीय महासंस्कृती महोत्सव अंतर्गत हिंगणघाट शहरातील रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर व बेला शेंडे व संचाच्या वतीने सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांच्या वतीने ढोल ताशा पथक, मल खांब, दांडपट्टा प्रात्यक्षिक, महाराष्ट्राची लोक परंपरा असलेली गीते लावणी पोवाडा गोंधळ आदींचे सादरीकरण होणार आहे.
दिनांक 24 रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व संचाचे वतीने बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यासाठी स्थानिक टाका ग्राउंड वर भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून चोहोबाजूंनी टिनाचे सुरक्षा कुंपण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सूयोग्य नियोजन होण्या करीता कार्यक्रमस्थळी वाहने नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नूतन शाळा मैदानात झुलेलाल मॉल समोर व डॉ आंबेडकर पुतळा मागील मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथूनच प्रेक्षकांना कार्यक्रम स्थळी पायदळ यावे लागणार आहे.
या कार्यक्रमस्थळी डॉक्टरांची चमू तसेच दोन ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरिता प्रवेशिका अनिवार्य असून एका प्रवेशिकेवर दोन व्यक्तींना प्रवेश मिळणार आहे . आसन व्यवस्था लक्षात घेता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती नगर पालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. सदर महासंस्कृती महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले आहे.