उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – नवजिवन कॉलनी मलकापूर अकोला येथे वंचित युवा आघाडी व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने माता भीमाई, माता रमाई संत गाडगे बाबा, संत सेवालाल या महापुरुष्यांच्या संयुक्त जयंती निमित्त छोटे मिलिंद आणि संच अकोला यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी प्रसिद्ध कव्वाल छोटे मिलिंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, माता रमाई, माता भीमाई आणि क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जीवन चरित्रावर गीत व शेरो शायरी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
हा भव्य दिव्य जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी नवजीवन कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय खंडारे, विवेकानंद वानखडे, जयंतराव सोनोने, प्रकाश डोंगरे, सरदार गोपनारायण, विशाल गवई, नरेंद्र आळे, कमल शेठ, समिता खंडारे, संध्याताई वानखडे, सीमा इंगोले, पंचफुला सिरसाट यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रविण पातोडे यांनी केले.

