प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 24 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी अंबरनाथ येथे एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात राज्यातील अनेक प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी उपस्थित राहणार आहे.
या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे असून संमेलनाचे उदघाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागतध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव हे आहेत.
यावेळी भव्य संविधान रॅली काढून संमेलनाला सुरुवात होणार आहे. या साहित्य संमेलनात संविधान, मराठी साहित्यातील बहुजनांचे योगदान या विषयांवर परिसंवाद होणार असून सपूर्ण राज्यातून कवी, लेखक आणि रसिक सहभागी होणार आहेत, या संमेलनाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
संमेलन यशस्वी होण्यासाठी शामराव सोमकुवर, धनंजय सुर्वे, सुनील दुपटे, सुधाकर सरवदे परिश्रम घेत आहेत.अधिक माहितीसाठी 9860133950 या क्रमांकावर सपंर्क साधावा.