अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दारुड्या पतीने नशेत आपल्या पत्नीचे शेगडीवर दोन्ही पाय धरुन जळाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
एक नराधम पती दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यानंतर बायकोला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने संतापाची परिसीमा गाठली त्याने चक्क बायकोला पकडून तिचे पाय जमिनीवर असलेल्या गॅस शेगडीवर धरले. त्यात तिचे दोन्ही पाय जाळाले. त्यानंतर कशी तरी तावडीतून सुटून ती घराबाहेर जीव वाचवत धावली. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान हा खळबळजनक प्रकार कापूस तळणी येथे घडला. यातील पीडिता 24 टक्के जळाली. आरती मुकेश तिडके वय 30 वर्ष रा. कापूस तळणी असे जखमी विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी माहुली जहागिर पोलिसांनी 16 फेब्रुवारीला सायंकाळी पीडित जखमी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती मुकेश अशोक तिडके वय 38 वर्ष कापूसतळणी याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. जखमी महिला अद्यापही अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.
महिलेने पोलिसात दाखल तक्रारीनुसार, आरोपी मुकेश तिडके हा पत्नी आरती हिला दारू पिऊन वारंवार त्रास देतो. तिला मारहाणदेखील करीत होता. तिचा शारीरिक, मानसिक छळ करून त्याने अलीकडे तिचे जिणे मुश्किल केले होते. तो तिला घरातून हाकलून देण्याची धमकीदेखील देत होता.
दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुकेशने पत्नीशी वाद घातला. तू तुझी मजुरी करत जा नि तुझे पोट भर, असे तो दारूत बरळला. अशातच त्याने घरातील स्वयंपाकघरात जमिनीवर असलेल्या गॅस शेगडीच्या पेटत्या बर्नरवर धरून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यात तिचे दोन्ही पाय जळाले. तिची आरडाओरड ऐकून काही शेजाऱ्यांनी तिडकेंच्या घरी धाव घेतली. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. तेथे तिने घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. त्यावर तिच्या आईने 16 फेब्रुवारी रोजी माहुली पोलिस स्टेशन गाठले.

