निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- तालुक्यातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील लोणी येथील एका नराधम मुलाने आपल्याच जन्मदात्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे. उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मनोज पांडूरंग सातपुते वय 45 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे.
शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपी मुलांने एका खोलीत जन्मदात्या आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्याला गंभीर जखमी केले.
त्यानंतर हा नराधम आरोपी इतक्यावरच थांबला नाही तो भावजयीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला. या घटनेनंतर आरोपी मनोज पांडूरंग सातपुते याने घटनास्थळावरून प्रसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. आता याप्रकरणी पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.