देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तयारी सुरू झाली आहे. त्याच अनुसंघाने रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांची 24 फेब्रुवारीला नागपुर येथील रविभवन येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
काही महिन्यांवर म्हटल्या पेक्षा काही दिवसांवर येवून ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका, देशात अस्थिरतेचे वातावरण, संविधानाची होत असलेली पायमल्ली व गगनाला भिडलेली महागाई, तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार नागपुरच्या रविभवन येथे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला कैलाश मोरे अमरावती, महेंद्र मुनेश्वर वर्धा, आर.जी. नितनवरे अमरावती, भीमराव डोंगरे नागपूर, संतोष इंगळे बुलढाणा, राजेश वानखेडे नागपूर, प्रिया खाडे चंद्रपूर, सचिन कोकणे अकोला, गणेश चंद्रशेखर वाशीम, कुवरलाल रामटेके गोंदिया, सतिश बनसोड भंडारा, शंकर आत्राम गडचिरोली इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हि महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तेंव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे हिंगणा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भाई देवेंद्र सिरसाट, महासचिव भाऊराव नितनवरे, दिपक डडमल यांनी केले आहे.
या बैठकीला १० ते ०४ वाजेपर्यंत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील हे मार्गदर्शन करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांची भेट घेतल्याने, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे नागपूरच्या रविभवन येथे २४ फेब्रुवारीला होत असलेल्या बैठकीला महत्त्व आले आहे.