श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड :— सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे बिल काढून दिले. त्याचा मोबदला म्हणून आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवक अशोक पुजारी यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी दि 13 सप्टेंबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धावडी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम करण्यात आले होते . या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक अशोक विठ्ठलराव पुजारी रा . ह.मु. हनुमान मळा , अंबाजोगाई , मूळ रा तेर जि . उस्मानाबाद याने कंत्राटदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याला लाच द्यायची नव्हती त्यामुळे कंत्राटदाराने बीडच्या एसीबीकडे तक्रार केली होती.
याबाबत पडताळणी दरम्यान तडजोडीअंती पुजारी याने 8 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते . त्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला.पुजारी याने कंत्राटदाराकडून लाचेपोटी 8 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप मारून त्यास रंगेहाथ पकडले . याप्रकरणी ग्रामसेवक अशोक पुजारी याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, कर्मचारी सुरेश सांगळे, हनुमंत मोरे यांनी पार पाडली

