हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि. २३ फेब्रुवारीला माऊंट इंग्लिश मिडियम स्कुल बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे “पास्को” (pocso) ॲक्ट कायद्या संदर्भात सभा घेण्यात आली. या सभेला उपस्थित माऊंट इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रिन्सिपॉल सैलेश झाडे तसेच उपस्थीत बल्लारपूर बार असोसिएशन मेबर ऍड. नाझीम खान, ऍड. पुसलवार तसेच व्हॉईस प्रिन्सिपॉल सौ.रूपाली जिवने पिटीए, सदस्या पत्रकार सौ. हनिशा दुधे उपस्थित होते.
पालकांना ऍड. नाझीम खान यांनी पास्को कायदा काय आहे ? पोस्को पॉलिसी ही कशा पद्धतीने कार्य करतात त्याच बरोबर काही ज्वलंत उदाहरण सांगितले तसेच ऍड. किशोर पुसलवार यांनी मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम, मोबाईल हाताळण्याची वाईट सवई वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टी बद्धल कसे समजावून सांगायचे खूप सुंदर रित्या स्पष्टीकरण दिले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेश झाडे पालकांना मुलांना मायेने कसे आपलेसे करावे, पालक मुला मुलींचे मित्र बणून त्यांच्या मनात विचारात काय दळले आहे ते प्रेमाने कसे माहिती करून घ्यायचे, या बाबत खुप सुंदर उदाहरण, स्पष्टीकरण देऊन सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पालकांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याला कसे ओळखावे आणि त्याबद्धल मुलांनी / मुलींनी कसे सतर्क राहावे याबाबत माहिती सांगितली. यावेळी पत्रकार सौ. हनिशा दुधे यांनी पण पास्को कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले.
या सभेला मोठ्या संख्येत पालक वर्ग उपस्थित होते तर शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच कनिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाची उपस्तीत होती तसेच कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षिका कु. राणी सदेन यांनी तर आभार प्रदर्शन अर्चान अमाराज यांनी केले.