जो पर्यन्त शासनाचे टँकर चालू होणार नाही तोपर्यंत स्वखर्चाने गावातील नागरीकांना पाणी पुरवठा करणार: सरपंच सुभाष चव्हाण
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातील माहोरा गावा मध्ये भिषण पाणी टंचाई चालू आहे. सध्या शेतातील सुगीचे काम जोमाने चालु आहेत. गावातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.अक्षरशा एका भांड्यासाठी तासनतास माता भगीनीला बसाव लागत. गावातील नागरीकांची ही समस्या सरपंच सुभाष चव्हाण यांच्या लक्षात आली त्यांनी लगेचच पंचायत समिती मंठा येथे गावातील पाण्याची समस्या पाणीपुरवठा अधिकारी यांच्या कडे टॅंकर चालू करण्यासाठी प्रस्ताव दिला.
परंतु शासकीय प्रोसेस नुसार तत्काळ पाणीपुरवठा करून शक्य नाही. परंतु जोपर्यंत शासकीय पाणीपुरवठा माहोरा गावाला होत नाही. तोपर्यंत सरपंच सुभाष चव्हाण हे स्वखर्चाने गावातील नागरिकांना पाणी पुरवणार आहेत.व दिनांक 24-2- 2024 वार शनिवारी या दिवसापासून सरपंच सुभाष चव्हाण यांनी स्वखर्चाने टँकर लावुन माहोरा गावाला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण माहोरा गावातील नागरीकांनी सरपंच सुभाष चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी पाणी टँकर चालू करत असताना सरपंच सुभाष चव्हाण, उपसरपंच कृष्णा राठोड, सुखदेव राठोड, राजु चव्हाण मेबर, प्रवीण राठोड ग्रामपंचायत कर्मचारी अशोक लींगसे, गजानन कोकाटे व माता भगींनी व गावकरी उपस्थित होते.