अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वना नदीच्या डंकीन शहालंगडी या भागाची मोठ्या प्रमानात दुरावस्था होत आहे. इथून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात आहे. हे दिसत असूनही प्रशासन, पोलिस खाते एलसीबी विभाग, नगर पालिका प्रशासन काहीच कारवाही करीत नसल्याचे दुदैवी चित्र आहे. यामुळे नदी संवर्धन प्रेमी मध्ये असंतोष पसरत आहे. त्यामुळे स्थानिय समाजसेवक श्याम इडपवार, डॉ. बी.आर आंबेडकर विद्यालयाचे सचिव अनिल जवादे यांनी या समस्या कडे पुलिस, प्रशासन चे लक्ष वेधले.
याच समस्या वर संदेश मून यांनी देखील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले याना निवेदन देउन समस्या कडे लक्ष वेधले. संपूर्ण हिंगणघाट शहराला डंकीनच्या विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे. परंतु मागील काही वर्षा पासून येथे अवैध रेती उत्खनन होत आहे. यामुळे नदीचे पात्र बदलत आहे. या आधी नदीच्या पानी चा प्रवाह हिंगणघाटच्या नदी किनाऱ्या वरून होत आहे. आणि बाजूच्या विहिरीत पानी संग्रहित करून संपूर्ण शहराला जल वितरण केले जाते. परंतु सततच्या रेती उत्खनन मुळे आता नदीचे पात्र कानापूर (डावीकडे) होऊ लागले आहे. ज्यामुळे विहिरीत पानी संग्रह करणे कठिन होत आहे. याच्या निराकरणसाठी नगर पालिकाने नदी चां प्रवाह विहिरीच्या (डाव्या) बाजूने केला आहे.
मागील वर्षा दोन वर्षा पासून हिंगणघाट शहरला उन्हाळ्यात कमी पाणी वितरण होत आहे. पाटबंधारे विभाग और जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीचे पात्र पूर्ववत करणे मोठ्या खर्चाचे आणि कठीण काम असल्याचे सांगितले. जर अश्याच प्रकारे रेती चोरी होत राहिली तर या उन्हाळ्यात हिंगणघाट शहरला पानी टंचाई होण्याची शक्यता आहे. या समस्या पाहता या वर तुरंत अंकुश लावण्याची मागणी केली जात आहे.
या विषयावर संदेश मून यांनी जिल्हाधिकारी याच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. डंकिन शहालंगडी पाणी वितरण समस्या वर काही उपाय सुचविले.
१.(डंकिन) ला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे.
२.परिक्षेत्र संबंधित अधिकाऱ्यांना रेती संरक्षण ची जवाबदारी देणे.
३.परिसर ला पर्यटन स्थळ चे स्वरूप देणे करिता नगर पालीका द्वारा पुनर्निर्मित करणे
४. मंजूर बंधारे चे कार्य त्वरित सुरू करणे, इत्यादि उपाय निवेदनात द्वारे सुचविण्यात आले.